मनात विचार आला ...आपण काय विचारू भोलानाथ ला ??
काय व्हावे असे वाटेल आपल्याला ???
promotion ? increment ? गाडी , घर , परदेश trip ? कदाचित काहीच सुचणार नाही...मलाही सुचत नाहीये ....काय विचारू या भोलानाथ ला? काय हवय मला?
कुठे गेल्या त्या लहान लहान मागण्या देवाकडून ? का विश्वास च नाहीये या भोलानाथ वर? का एवढे mature झालोय की काही मागणे शोभून दिसत नाही म्हणुन गप्प आहोत? का सगळेच मिळाले आहे आपल्याला?
हट् साली सगळी निरागसताच हरवली आहे कुठेतरी...
लहानपणी कशा एकदम सरळ सोप्या मागण्या असायच्या ...शालेला सुट्टी...कोणाचा तरी 'Happy Birthday' असावा अणि chocolate मिळावे , बर्फाचा गोळा खाताना आईने बघू नए.....नंतर शिंग फुटल्यावर boyfriend बरोबर बघू नए....
या sem ला atleast 40 तरी मिळूदे या अणि अशा अनेक सोप्या मागण्या...भोलानाथ मिळेल ना रे first class??
मग नोकरी , लग्न , मूल .....मोठ्या मोठ्या अणि जरा किचकट मागण्या....
पण आता भोलानाथ तुला फारच रिकामे रिकामे वाटत असेल ना रे? recession आलय समज :) कधीतरी तुलाही सुट्टी नको?
कदाचित फक्त माझ्याकडूनच workload कमी झाले आहे...
तुम्ही सांगा...काय विचाराल भोलानाथ ला?
Ha blog bhari aawadala aapalyala....ekadam amzyach manatala lihilyasarakha vatal. :) too good.
ReplyDelete