Friday, April 17, 2009

मी अणि माझे खेळ जीवन :)


गेल्या एकंदरीत २८ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास बघता असे म्हणायला हरकत नाही की " खेळणे माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी खेळत राहणारच " या वाक्याशी मी एकनिष्ठ आहे :)
तशी मी काही कुठल्या खेळात champion वगैरे नाही हं !!! पण प्रत्येकात नाक खुपसून झाले आहे :) नाक म्हणजे हाथ पाय हो....
फार लहानपणाचे काही आठवत नाही (ते कोणाला आठवते म्हणा ) ....पण मोठ्या भावाशी घरगुती cricket खेळणे ..तेही धुपट्ण्याने .. धुपाटणे माहित आहे का हो तुम्हाला? तुम्ही जर अजुन शिकत असाल तर शक्यता कमीच आहे !!! असो, तर घरी hall मध्ये आम्ही धुपाटणे as a bat घेवून अगदी commentary सहित cricket खेळायचो...माझ्या दादाची fav team West Indies आणि माझी भारत .....मग सचिन ला Ambrose नाहीतर Walsh bowling टाकायचे....अणि मग लारा बैटिंग ला अल की दादा left hand ने खेळायचा.....सोफयाखाली ball गेला तर २ runs. direct kitchen मध्ये गेला तर ४ :) अशी एकंदरीत धमाल होती !!!
आम्ही असे घरी बरेच खेळ खेळायचो....आंधळी कोशिंबीर , पाय-पाय ..हा एक आमचा fav game होता....पाय-पाय म्हणजे ३ उड़यांमध्ये दुसरयाच्या पायावर पाय ठेवायचा ..अणि दोघानी एकाच वेळी उडी मारायची हा नियम ... अगदी अश्या मैदानी खेळाचा कंटाळा आलाच तर कागदी fighter planes बनवून त्यांची मारामारी खेळायचो :) :) घरगुती खेळामध्ये २०-२० या खेळाचाही समावेश होता बर का...म्हणजे हे आपले lalit modi चे २०-२० नाही हा ....ते famous person मनात धरतात मग २० प्रश्न विचारून उत्तर शोधायचे तो game....हा सहसा आम्ही light गेल्यावर खेलायचो :) एकदा मी मनात वीरप्पन धरला होता , दादाने विचारले "राहतो कुठे" मी खरे सांगितले "जंगलात".....हे हे ..... अरे हो अजुन एक खेळ आठवला ...."सांग बर 'हे' कुठे लिहिले आहे" अणि मग कुठेतरी कानाकोपर्यात लिहिलेले शोधायचे हे ही आम्ही light गेल्यावर खेळायचो :) तर हे झाले घरगुती खेळ ....माझ्या building मध्ये सगळी पोरेच असल्याने मीही मुलांमध्ये मैदानी खेळ खेळू लागले....थोडी tomboyish होण्यात हे एक महत्वाचे कारण आहे... मग donkey-donkey , लपाछपी , badminton , विष-अमृत खेळणयात दिवस दिवस निघून जायचे..

शाळेत sports days ला खो-खो , लंगडी , कब्बडी ....आजकाल खेळतात का हे शाळेत ??? असो , तर आई आवर्जुन मला श्रीखंडाच्या गोळ्या द्यायची ..खेळता खेळता खा काहीतरी म्हणुन ....त्या अर्थातच सकाळी च मैत्रिणिंना वाटुन संपून जायच्या :) शाळेत पीटी च्या तासाची अगदी चातकासारखी वाट बघायचो ....पण गुरुवारी नाही..गुरुवारी खरोखर पीटी व्हायची ..इतर वेळी नुसते खेळणे ..धांगड धींगा :) सोनसाखळी हा main खेळ असायचा मला आठवते आम्ही मोठे मोठे दगड घेवून त्याचे सिंहासन वगैरे पण बांधायाचो....का कुणास ठावुक ..आता नाही आठवत ...
मग jr. college मध्ये मी एक नविन खेळ शिकले...throwball....अणि तो इतका आवडला की पुढची ६ वर्षे नियमित खेळत आले..

.Engineering ला प्रवेश घेतला....जरा स्थिरस्थावर झाल्यावर जेंव्हा second sem आले अणि sports ची चाहुल लागली तेंव्हा माझ्यातला sports person जागा झाला अणि मग box-cricket , badminton, carom, बुद्धिबल अणि सगळ्यात आवडते throwball सुरु झाले..... college च्या मध्यभागी corridor मध्ये आपण आपल्या team बरोबर खेळतोय , अकखे college support करत आहे..."tronix....tronix..." ओह ....अजुनही ती गूंज कानात आहे... काय वेड्यासारखे खेळायचो आम्ही.....even semester सुरु झाले रे झाले की आम्ही सरांकडे ball मागायला जायचो ....एकदा ball फुस्स झालेला तर कुठे puncture काढणारा मिळतो का शोधत भर दुपारी अक्खे कोपेर्खैराने पालथे घातले होते...शेवटी कोणीच न मिलाल्याने lab मधला एक हवा भरायचा pump काढून आम्ही तिघी....एकजण ball धरून , दूसरी हवा भरतेय अणि तीसरी band-aid धरून उभी.....भोक बंद करायला ....हा हा हा .....हा scene आठवला की अजूनही आम्ही पोट धरून हसतो....
असे हसत -खेळत दिवस जात होते... मग मध्ये काही वर्ष या माझ्या खेल जीवनात खंड पडला ...नोकरी , लग्न .... नाही म्हणायला पत्ते खेळत होतो आम्ही.....
पण मग project निमित्त US ला यायचा योग आला....seattle la Microsoft मध्ये असताना परत एक नविन सुरुवात झाली.. Microsoft चे वातावरण च वेगले होते....तिथे काम करायची एक आगळीच मजा....तिथे दर बुधवारी आम्ही volleyball खेलायाचो.....manager अगदी ओढून ओढून चला बस काम आता खेळा म्हणुन घेवून जायचा....volleyball खेळण्यात ही एक भारीमजा होती.....अगदी जीव तोडून खेलायचो. दर शुक्रवारी ऑफिस मध्ये poker ही खेळायचे...पण ऑफिस मध्ये पैसे लावून खेळणे हा माझ्या मध्यम वर्गीय मनाला फार मोठा धक्का होता....सुरुवातीला खेलुन पाहिले.....नविन खेळ म्हणुन...मजा ही आली...पण फारच $ जात आहेत हे बघून मी रामराम ठोकला :) US ला सगल्या apartment complex ला असते तसे tennis court माझ्याही घराजवळ होते....मग टेनिस ही try करून बघितले...ते यथातथाच जमले ....
आता परत एकदा खंड पडला आहे.... सध्या तरी "peek-a-boo" खेळण्यात च दिवस जात आहेत :) लवकरच माझ्या पिल्लाला football /tennis / cricket ची गम्मत कळेल अणि माझा हा खेल प्रवास परत सुरु होइल :):):)

No comments:

Post a Comment