Tuesday, April 2, 2013

बाप्पा

"बाप्पा बघत असतो सगळे , बर का वेद ...."
"if i am hiding , can he see me ?"
"हो, तरीही..."
"कसे काय दिसते त्याला सगळे ??"
"त्याचे घर त्या उंच आकाशात आहे...तिथून सगळे दिसते त्याला "
"पण मला नाही दिसत तो..."


"आई , now i am hiding under table....can he still see me ? "
"yupe, He can still see you  "
"now? NOW can he see me ?" अजून लपायचा प्रयत्न...
"हो"
"but how?"
"he got super powers"...
"why he got super powers ? why dont i have super powers ? how can i get super power ?"


"झाली का रे?"
"नाही अजून....."
"आई, can bappa see me doing potty ??"
" गप्प रे... आणि हो, he can still see you ...चल आवर आता पटकन ".

1-2 wks.....अजूनही तोच प्रश्न अधून मधून.....

"अहाहा , काय मस्त sunny आहे आज...चल park मध्ये जाऊया..."
"मुग्धा आपली ती flying dish कुठे गेली ?? " " अरे असेल वेद च्या खेळण्यांमध्ये कुठेतरी "
"श्या , एरवी इकडे तिकडे लोळत असते,नेमकी आता जागेवर नाही"
"त्या तिकडे बघ ...vaccum cleaner ठेवतो तिथे..." " तिथे ??? तिथे कशी जाईल ?" "काही सांगता येत नाही , just have one look"
"nope, नाहीये रे मंदार ..."
"जाऊदे , मिळेल नंतर कधीतरी, lets play bad minton today "
"चला चला लवकर बाहेर निघा..."
:
:
:

"आई , can bappa see flying dish ?"