ऑफिस ला जातानाच्या घाईत तिला स्कूटी च्या आराश्यातून मागुन येणारया बाईक चा headlight चालू दिसला ...तिने twinkle twinkle little star ची action केली पुढच्या वेळी आरश्यात बघितले तेंवा headlight off होता :) ती खुश झाली
सिग्नल ला गाडी थांबली ...तिच्या शेजारी उभ्या टोणग्याने पचकन थुन्कून धरती पावन केली....तिने एक जळजळीत कटाक्ष टाकला , आळीपाळीने एकदा बिचारःया धरनी माय कड़े अणि एकदा त्या @#^%$ कड़े...
तिचा पुढचा सिग्नल green असताना दुसर्या बाजूची वाहने संधि-साधू पणा करू लागली..तिने होते नव्हते सगळे बळ एकवटून जोरात horn वाजवला आणि तिचा पुढे जाण्याचा हक्क बजावला ...
रात्री साडेनाऊ वाजता बॉसने विचारले , आज EOD (??!!) पर्यंत होईल ना पूर्ण ?? एक दीर्घ सुस्कारा सोडून ती नुसतीच हसली...
११ वाजता टाटा करून निघत असताना सहकारी खुणेने विचारले drop?? तीही निग्रहाने बाइक च्या keys दाखवून डोळे मिचकावून थॅंक्स म्हणाली ...
एक दिवस संपलेला असतो....दुसर्या दिवसाची मूकपणे वाट बघत...
ता . क. : इथे तिच्या बाळाच्या आणि तिच्या मूक संवादाचे वर्णन करावे एवढे सामर्थ्य माझ्या शब्दात नाही....
Subscribe to:
Post Comments (Atom)
aai shapattha!!! touched!! no words for me...bas bhetavasa vatala tula ekadam!
ReplyDelete